Tuesday, May 6, 2014

Ek Solid marathi funny sms

एका गृहस्थाला सपाटून भूक लागली, म्हणून तो हॉटेल शोधत होता.

तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिलं होतं , 'जेवणाची उत्तम सोय' जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .

एकावर लिहिलं होतं 'शाकाहारी'तर दुसर्यावर 'मांसाहारी'तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.
...
आतमध्ये आणखी दोन हॉल होते.डावीकडे पाटी होती , 'भारतीय बैठक'
तर उजवीकडे , 'डायनिंग टेबल'

तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला. आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.
एकावर पाटी होती 'रोख'
तर दुसर्यावर 'उधार'.

तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.
वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली.तो अचंबीत
झाला.

त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच त्याला खिजवायला,
'फुकट्या', मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच
आहे. हॉटेल नाही.

No comments:

Post a Comment